व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार

व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार
शिंदखेडा – राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री मा नामदर जयकुमार भाऊ रावल मंत्रीपदी विराजमान झाल्या बद्दल शिंदखेडा तालुका व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा प्रदीप दीक्षित,उपाध्यक्ष भूषण पवार,सरचिटणीस संजयकुमार महाजन,मनोज गुरव,महेंद्र मराठे आदी उपस्थित होते.मंत्री मा नामदर जयकुमार भाऊ रावल यांची शिंदखेडा येथील श्री सातपुडा तापी परिसर संमिश्र अपंग शिक्षण समिती उज्वल शैक्षणिक संकुल जाधव नगर येथे आयोजित कला महोत्सव पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.प्रसंगी शिंदखेडा नगर पंचायत चे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, उज्वल शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आर आर पाटील, भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप दीक्षित व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री जयकुमार भाऊ रावल यांचा सत्कार केला तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
धुळे जिल्ह्यासाठी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तब्बल २५ वर्षानंतर धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी जिल्ह्यातील मंत्री लाभल्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
– प्रा. प्रदीप दीक्षित तालुका अध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघ शिंदखेडा