स्वो.वि.संस्थेच्या दादासाहेब रावल हायस्कुल व ज्यु.कॉलेज मालपूर येथे आंतरवासिता छात्रशिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न

स्वो.वि.संस्थेच्या दादासाहेब रावल हायस्कुल व ज्यु.काॕलेज मालपूर येथे आंतरवासिता छात्रशिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न
मालपुर (गोपाल कोळी) – मालपुर, शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे स्वो.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल व ज्यु.काॕलेज आंतरवासिता छात्रशिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्षपद म्हणून कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी स्विकारले.प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथपाल प्रमोद राजपूत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्येची देवता माता सरस्वतीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ,प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
प्रतिमा पुजना नंतर आंतरवासिता छात्रशिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधुचा सन्मान करण्यात आला.
गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत छात्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त अध्यापन न करता विविध उपक्रम देखील त्यांनी राबवले.निबंधस्पर्धा,चित्रकलास्पर्धा,रांगोळीस्पर्धा,वर्ग सजावट अशा उपक्रमात नंबर पटकावलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना वही,लेखणी,स्केचपेन,रंगपेटी ह्या वस्तू देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला.
विद्यार्थ्यांनी त्यांना छात्रशिक्षकांकडुन मिळालेला अध्ययन अनुभव कथन केला.तदनंतर सर्व छात्र शिक्षकांनी त्यांना तीन महिन्यात आलेला अनुभव सांगताना गहिवरून आले होते.मुख्याध्यापकांच व इतर सर्व शिक्षकांच मोलाच सहकार्य कसे मिळाले याविषयी अनुभव सांगितला.
शिक्षकांमध्ये राजेंद्र गिरासे ,सुभाष ठाकरे,मिना चव्हाण ,रत्ना राजपूत यांनी तीन महिन्याच्या कालावधीत छात्रशिक्षकांनी केलेले अध्यापन ,राबवलेले उपक्रम याविषयी गौरवोदगार काढले .भावी आयुष्यातील वाटचाल सुखकारक,कशी राहिल याविषयी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षिय मनोगत व्यक्त करतांना मुख्याध्यापकांनी देखील छात्रशिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयी व तीन महिन्यात विद्यार्थ्यांना आपलेसे कसे केले ,विद्यार्थ्यांना देखील छात्रशिक्षकांचा लळा लागला होता असे गौरवोदगार काढले.
विशेष बाब म्हणजे सर्व छात्रशिक्षकांनी मिळुन शाळेला भिंतीवरील घड्याळ भेट म्हणून दिले .तसेच उदय छात्रालयातील विद्यार्थ्यांना चार डझन वह्या भेट म्हणून मुख्याध्यापकांच्या स्वाधीन केल्या.
शिक्षकांमध्ये राजेंद्र गिरासे ,सुभाष ठाकरे, शशिकांत सोनवणे, मोहन पाटील,मिना चव्हाण ,रत्ना राजपूत,दिपक पाटील,बिपिनचंद्र पटेल,पुनम धनगर शिक्षकेतर बंधुमध्ये छोटु भाऊसाहेब,बावा भाऊसाहेब, आननसिंग गिरासे, दिलराज ठाकरे आंतरवासिता शिक्षकांमध्ये राजश्री पाटील,निकिता जाधव,गायत्री गिरासे ,सरिता वानखेडे,संदिप चव्हाण ,उमेश महाले उपस्थित होते .