धुळयात प्रथमच एकदिवसीय नॅशनल सायबर कॉन्फरन्सचे आयोजन

धुळे – सध्याच्या आधुनिक काळात आपण सर्व जण एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जुळलेले आहोत याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असतात. त्यामुळे सर्वांना आपली सायबर सुरक्षा करणे अत्यंत आवश्यक आहे. याची दखल घेत सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी धुळे शहरात एस. व्ही. के. एम. कॉलेज येथे दि. १२ एप्रिल २०२५ रोजी एकदिवसीय नॅशनल सायबर कॉन्फरन्स १.० मिशन सायबर गुन्हेगारीमुक्त खान्देशचे आयोजन केले आहे.
या कॉन्फरन्समध्ये जगभरातील विविध सायबर तज्ञांचा सहभाग असणार आहे. यात प्रसिध्द सायबर तज्ञ अॅड. डॉ. प्रशांत माळी व डॉ. रक्षित टंडन यांचे देखील मार्गदर्शन सर्वसामान्य जनतेस लाभणार आहे व त्यांचे मार्गदर्शन हे मोलाचे ठरणार आहे. या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत सायबर सुरक्षिततेबाबत व वाढत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इ. या सर्व विषयांबाबत जाणुन घेण्याची संधी सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे. या राष्ट्रीय परिषदेत सायबर अवेरनेस फौंडेशन यांच्यातर्फे सायबर क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणा-या व या क्षेत्रात विशिष्ट योगदान देणा-या व्यक्तींना “डिजीटल हिरो अॅर्वार्ड २०२५” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी सर्वानी या राष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहून सायबर तज्ञांकडून सायबर सुरक्षिततेविषयी मोलाचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन सायबर अवेरनेस फौंडेशन व सायबर क्लोक डिजीटल लिगल सर्व्हिसेसचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी, यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. नं. ७७७४९७७७७९, ८४१२९७५७४१ या क्रमांकावर संपर्क करावा.