ईश्वर माळी अहिराणी गौरव पुरस्काराने सन्मानित

खान्देशातील पहिला अहिराणी चित्रपट निर्माता दिग्दर्शक ईश्वर माळी
दोंडाईचा (गोपाल कोळी) – शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील अहिराणी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक ईश्वर माळी यांना अमळनेर येथे नुकताच अहिराणी साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी नाट्यगृहात अहिराणी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार खान्देशातील पहिला निर्माता दिग्दर्शक व अहिराणी चित्रपट काढून अहिराणी भाषेला कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोलाचे कार्य करणारे माळीच येथील सामान्य कुटुंबातील मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारा हा कुटुंबप्रमुख ईश्वर भाऊ माळी अहिराणी भाषेतून पहिला चित्रपट काढण्यासाठी केलेली धडपड मोल मजुरीने कमावलेला पैसा चित्रपट निर्मितीसाठी उभा केला मित्रांकडून उसनवारीने चित्रपटासाठी पैसा उभा करून पहिला चित्रपट काढला यासाठी अहिराणी कलाकार त्यावेळी मिळणे कठीण होते अशातच लोकांची अहिराणी चित्रपट काढतांना सुरुवातीला मिळणारी वागणूक वेड्यासारखी होती.परंतु परिस्थितीला हार न मानता कलेची आवड व चित्रपट काढतांना गावाची साथ मित्रांचा आधार स्वतःची जिद्द चिकाटी आणि अहिराणी विषयी असलेली आपुलकी व चित्रपटात अहिराणी कलाकार तसेच महिला कलाकार मिळण्यासाठी केलेली धडपड यामुळे पहिला अहिराणी चित्रपट काढून खान्देशात मान सन्मान मिळाला मात्र पैसा चित्रपट कंपनीने कमविला नावाने श्रीमंत झालो मात्र परिस्थितीने गरीबच होतो अशा कठीण परिस्थिती गावकऱ्यांनी मला मोलाची साथ देऊन चित्रपट निर्मितीसाठी खूप मोलाचे सहकार्य केले या कार्याची दखल घेत तब्बल 25 वर्षांनी अंमळनेर येथे अहिराणी साहित्य संमेलनात आयोजकांनी पुरस्कारासाठी निवड करून मला अहिराणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ दिगंबर महाले कार्याध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार डी. डी. पाटील, रणजीत शिंदे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन अहिराणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना माळी समाजाचे नेते हिलाल माळी विलास महाजन पांडुरंग माळी भिला पाटील प्रवीण महाजन युवराज माळी यांनी अभिनंदन केले.
पुरस्काराचे श्रेय माळीच गावकरीना एका सामान्य कुटुंबातील मोल मजुरी करणाऱ्या कलाकाराला गावकऱ्यांनी अहिराणी चित्रपट काढण्यासाठी केलेली मदत दिलेला आत्मविश्वास केलेले वेळोवेळी सहकार्य यामुळेच मी पहिला अहिराणी चित्रपट काढून गावाने मला प्रोत्साहित करून उत्साह वाढवला यामुळे या पुरस्काराचे चे खरे श्रेय माझे माळीच गावकऱ्यांना देतो.
– अहिराणी गौरव पुरस्कार प्राप्त ईश्वर माळी