आदिवासी तरूणाला मारहाण आरोपींना शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पाठबळ ?

आरोपींना लवकरात लवकर अटक करा धुळे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे भिल समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा.दिपक दादा अहिरे यांची मागणी
दोंडाईचा (गोपाल कोळी) – आकाचे पाठबळ असल्याचा संशय शिंदखेडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यावर देखील 18 दिवसांपासून आरोपी मोकाट
बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन जसे आका,बोक्या समोर हतबल झाले तसेच शिंदखेडा पोलीस स्टेशन झाले आहे का आरोपींना लवकरात लवकर अटक करा धुळे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे भिल समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा.दिपक दादा अहिरे यांची मागणी दि.13 /3/2025 तारखेला दलवाडे शिवार येथील गुरदत्त पेट्रोल पंपावर कामावर असलेल्या गरीब आदिवासी तरूण विजय भिमराव भिल याच्यावर 10 ते 12 जणांनी जिवणघेणा हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केली होती हल्ला हा जिव घेण्याचा उद्देशानेच केला होता.पिडीत तरूणाने फिर्याद दाखल करून शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
परंतु गुन्हा दाखल होऊन 18 दिवस उलटले तरी देखील आरोपी हे मोकाट आहेत.पिडीताला मारहाण करतांनाचा सीसीटीव्ही उपलब्ध असून आरोपींचे क्रूर चेहरे स्पष्ट दिसत असून देखील शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पि.आय.मा.बाळासाहेब थोरात हे झोपेचे सोंग घेऊन कारवाई करण्यात असमर्थ दर्शवत आहेत.आकाचा बोक्यांचे पाठबळ असल्याची शिंदखेडा तालुक्यात चर्चा सुरू असून सदरील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा भिल समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा.दिपक दादा अहिरे यांनी दिला आहे. यावेळी पिडीत तरूण विजय भिमराव भिल , दोडाईंचेतील आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता अशोक भाऊ सोनवणे , बापू ठाकरे , अशोक ठाकरे , राजेश मालचे श्रीराम मोरे , गोपाल भिल उपस्थित होते.