सुराय ग्रामपंचायती तर्फे ८० दिव्यांग बांधवांना ५℅ निधी वितरीत

सुराय ग्रामपंचायती तर्फे ८० दिव्यांग बांधवांना ५℅ निधी वितरीत
मालपुर (गोपाल कोळी) – सुराय , शिंदखेडा तालुक्यातील सुराय ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सुराय, कलवाड़े,चुडाणे, अक्कलकोस या चार गावांतील ८० अपंग बांधवांना ब्लॅकेटचे वाटप प्रजासत्ताकदिनी करण्यात आले. गतवर्षी अपंग बांधवांना फिल्टर पाण्याचा जार देण्यात आला होता. पाच टक्के ग्रामनिधीतून अपंग बांधवांच्या उत्थानासाठी सुराय ग्रामपंचायत खर्च करीत आहे. या वेळी अपंग बांधवांनी समाधान व्यक्त केले. या वेळी सरपंच उज्जनबाई जाधव, उपसरपंच गुलाब पाटील, ग्रामविकास अधिकारी सागर भदाणे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सोनवणे, माणिक मालचे, सरलाबाई देशमुख, कमलबाई मालचे, नानजी चव्हाण, संपत साळवे, ज्ञानेश्वर पाटील, मोहन जाधव गटनेते रविंद्र पाटील आदी सह मोठ्या संख्येने गावातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.