जिल्हा बँकेतील धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला करावासासह दंडात्मक शिक्षा

जिल्हा बँकेतील धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला करावासासह दंडात्मक शिक्षा
धुळे – धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धनादेश प्रकरणी आरोपी मांगीलाल चिंधा कोकणी यांना नंदुरबार जिल्हा न्यायाधीश साहेब यांनी युक्तिवाद ऐकूण आरोपीला एक वर्ष कारावास धनादेशाची दंडासह रक्कम दोन लाख 75 हजार 413 रुपयांच्या रोख दंड ठोठावला अशी माहिती धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यातील अजेपूर पो सुतारे गावातील मांगीलाल चिंधा कोकणी यांनी जिल्हा बँकेकडून मध्यम मुदतीचे ठिबक सिंचन कर्ज घेतलेले होते परतफेडीची ग्वाही दिली होती परंतु मांगीलाल यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर परतफेड केले नाहीत त्यामुळे कर्जाच्या परतफेडीबाबत बँकेने सांगितले. कर्जाच्या परतफेड़ीसाठी आरोपीने दिलेला धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने अनादर झाला.
धनादेश परत आल्याने बँकेने एडवोकेट मनोज गजानन परदेशी यांचे मार्फत नंदुरबार कोर्टात दि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट एक्ट चे कलम 138 प्रमाणे फिर्याद दाखल केली. या प्रकरणी मा न्यायालयात कामकाज झाले, दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी मा जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 साहेब यांनी आरोपी दोषी धरून एक वर्षाच्या साधा कारावास व चेकची रक्कम व त्यावर दंड अशी एकूण दोन लाख 75 हजार 413 अशी दंडाची शिक्षा सुनावली.