April 5, 2025

स्वो.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल दोंडाईचा येथे मराठी राजभाषा गौरव दिन व वि. वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस साजरा

0
WhatsApp Image 2025-02-27 at 4.17.56 PM

स्वो.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल दोंडाईचा येथे मराठी राजभाषा गौरव दिन व वि. वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस साजरा

दोंडाईचा (गोपाल कोळी) – आज दिनांक 27/02/2025 वार गुरुवार या दिवशी.स्वो.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल दोंडाईचा येथे
मराठी राजभाषा गौरव दिन व वि. वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले शाळेचे जेष्ठ शिक्षक एम.बी. बाविस्कर सर होते. तर प्रमुख पाहुणे उपमुख्याध्यापिका भाग्यश्री भावे मॅडम होत्या जी. के. राजपूत सर व हर्षवर्धन बागल सर एस एस पाटील मॅडम आर बी माहेश्वरी सर व्यासपीठावर उपस्थित होते शाळेतील विध्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला असून मराठी भाषा विषयी महत्व सांगितले.

वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव कुसुमाग्रज हे नाव कुसुम नावाची लहान बहिण असून थोरले भावाच्या आग्रहाने कुसुमाग्रज असे नाव ठेवण्यात आले त्यांनी अनेक काव्यसग्रह व नाटक लिहली. प्रमुख वक्ता म्हणून एम आर गिरासे सर यांनी मराठी भाषाला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असून व इंग्रजी A फॉर apple ने सुरु होते शेवटी Z फॉर Zebra वर संपते शेवटी जनावर बनवून सोडते पण मराठी विश्वामधली एकमात्र भाषा लिपी आहे जी व्यक्तीला अ पासून अज्ञानी पासून ज्ञ म्हणजे ज्ञानी बनवून टाकते भाषेचे महत्व सराने सांगितले.

प्रमुख पाहुणे भाग्यश्री भावे मॅडम यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, आपण जास्तीत जास्त मराठी भाषेचा मान ठेवला पाहिजे.असे प्रतिपादन केले. शेवटी अध्यक्ष भाषण एम बी बाविस्कर सर यांनी मराठी भाषा जगात का श्रेष्ठ आहे याच महत्व सांगितले शाळेचे शिक्षिका एस एस पाटील मॅडम यांनी माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा मराठी भाषा खरंच श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाय. आर. पाटील मॅडम यांनी केले. हर्षवर्धन बागल सर कार्यक्रमाचे आभार व्यक्त कले. कार्यक्रमाला शोभा वाढविण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनीं व शिक्षकेतर कर्मचारी विशेष मेहनत घेतली. संस्थेचे खजिनदार सी. एन. राजपूत सर संस्थेचे सामान्य प्रशासन सचिव ललित भाऊसाहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक व्ही. बी. चौधरी सर यांनी मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *