April 5, 2025

स्कॉर्पिओ मोटारसायकल अपघातात एक जागीच ठार, एक महिला गंभीर जखमी

0
WhatsApp Image 2025-02-26 at 5.35.21 PM

स्कॉर्पिओ मोटारसायकल अपघातात एक जागीच ठार, एक महिला गंभीर जखमी
चालकासह 5जण फरार

 

 

 

शहादा – शहादा-प्रकाशा रोडवर भरधाव वेगाने स्कार्पीओ वाहनाच्याधडकेत मोटर सायकर स्वार जागीच ठार झाला तर एक पादचारी महिला गंभीर जखमी झाली आहे. स्कॉर्पिओ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला वळण घेणाऱ्या दुचाकीस्वार व्यक्तीस जोरदार धडक दिल्याने ती व्यक्ती फुटबॉल प्रमाणे पंधरा फुट वर जाऊन खाली आदळल्याचे प्रत्यक्ष दर्शी यांनी सांगितले.  मोटर सायकल स्वार यांच्या डोक्याला व कंबरेला जबर मार लागुन रक्तबंबाळ झाले होते. याच वेळेस पादचारी महिलेला चिरडले ती महिला गाडीच्या खाली अडकल्याने तिला गंभीर दुखापत झाली आहे.दुचाकीस्वार व्यक्तीस ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सदरची घटणा बुधवार सकाळी आकरा वाजेच्या सुमारास गुलमोहर हाँटेल लगत घडलेली आहे.

बुधवारी सकाळी आकरा सव्वा आकराचा सुमारास डीडी आय सी ८०७३ स्कार्पीओ वाहन चालविणाऱ्या वाहन शहादा कडुन प्रकाशा कडे भरधाव वेगाने जात असतांनाच वनवे रस्तावरुन शिरुड चौफुलीकडे जीजे २१ पी ८००१ बजाज दुचाकीस्वार वाहन वळण घेत असतांना पाठी मागून येणाऱ्या स्कार्पीओने भरधाव वेगाने मोटरसायकल स्वारास जोरदार धडक दिली यात वाहन चालक सुरेश गोविंद पाटील (वय ६५)रा कवळीद ह. मु परिमल काँलनी शहादा हे फुटबॉल सारखे वरती उधळत खाली पडल्याने डोक्याला व कंबरेला जबर मार लागुन रक्तबंबाळ झाले व याच वेळेस कविता अन्ना निकम (वय ३५) सदर महिला पायी जात असतांना तिला वाहणांची धडक लागल्याने महीला जखमी झाली अपघात इतका जबरदस्त होता की, अपघात होताच वाहनातील एअर बॅग उघडल्याने वाहनात बसलेल्यांना कोणतीही इजा झाली नाही.

अपघात होताच लागलीच लगतचे दुकानदार, शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले घटणास्थळी लागलीच पोहचल्या नंतर रुग्णवाहिका उपलब्ध करून एकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर महिलेस शहरातील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यावर नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अपघातात एक मयत झाल्याचे लक्षात येताच स्कार्पीओ वाहन चालक व मिळालेल्या माहितीनुसार वाहनातील पाच यूवक फरार झाले आहेत. प्रयाग राज येथून कुंभ मेळ्यात स्नान करून ते yet असल्याची माहिती हाती आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *