रावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव

रावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव
दोंडाईचा (गोपाल कोळी) – दोंडाईचा येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे दादासाहेब रावल महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. सि. एन. राजपुत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सामान्य प्रशासन सचिव श्री. ललितसिंह गिरासे होते. यावेळी महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. डी. गिरासे यांनी प्रास्ताविकेतून महाविद्यालयाची विविध क्षेत्रातील वाटचालबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री. ललितसिंह गिरासे यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही तसेच वेळेचे आणि शिस्तचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सि. एन. राजपुत यांनी संस्था विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी बांधील आहे आणि शेवटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उच्च पदावर अधिकारी व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद महाजन व प्रा. डाॅ. चंद्रकांत जाधव यांनी केले. आभार प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. डाॅ. के. के. कापडणे, डॉ. पी. एस. गिरासे, प्रा. डाॅ. देवेंद्र धाकड, प्रा. डॉ. कैलास चौधरी, श्री. योगेंद्र राजपूत, श्रीमती रत्नमा राजपूत श्री. रणजीत राजपूत आदींनी परिश्रम घेतले.