April 6, 2025

शासकीय हद्दीतून अवैध गौण खनिजाचे उत्खनन, रावेरसह परिसरातील 15 जणांना अप्पर तहसील कार्यालयाच्या नोटिसा….

0

शासकीय हद्दीतून अवैध गौण खनिजाचे उत्खनन, रावेरसह परिसरातील 15 जणांना अप्पर तहसील कार्यालयाच्या नोटिसा….

धुळे – शासकीय हद्दीतून बिना रॉयल्टी अवैध उत्खनन करणाऱ्या रावेरसह आजूबाजूच्या परिसरातील 15 गौण खनिज माफीयांना अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने नोटीस पाठवण्यात आला आहे. पाठविण्यात आलेल्या नोटिसीला 24 तासाच्या आत खुलासा न केल्यास बाजारभावाच्या पाचपट रकमेने दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल असं नोटीसित नमूद करण्यात आला आहे.

रावेरसह आजूबाजूच्या परिसरातील शासनाची कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करण्यासाठी गौण खनिज माफीयांनी धुमाकूळ घातला आहे. या अगोदरही अनेकांना दंड देखील करण्यात आला आहे. मात्र शासकीय हद्दीतून थोडे थोडके नव्हे तर हजारो ब्रास अवैधरित्या उत्खनन केल्याचं मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठींच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ पंचनामा करत अहवाल सादर केला प्रांत अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर सदरचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. सादर करण्यात आलेल्या अहवालच्या अनुषंगाने अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांनी रावेरसह आजूबाजूच्या 15 गौण खनिज माफी यांना नोटिसा बजावल्या आहे.

या नोटीसिला 24 तासाच्या आत खुलासा न केल्यास पाचपट बाजारभावाप्रमाणे या 15 गौण खनिज माफीयांकडून शेकडो कोटी रुपयांच्या वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याचं नोटिसीमध्ये नमूद आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *