दोंडाईचा चोरीतील गुन्हेगारास दोन दिवसात अटक, दोंडाईचा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

दोंडाईचा चोरीतील गुन्हेगारास दोन दिवसात अटक, दोंडाईचा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
शिंदखेडा – दोंडाईचा येथील शालिग्राम युवराज सैंदाणे यांच्या घरातून दि 18 शनिवारी घरातून रुपये दहा हजार चोरी झाली.
दोंडाईचा पोलिस स्टेशनं येथे दि 18 शनिवारी शालिग्राम युवराज सैंदाणे (45) व्यवसाय मजुरी रा डालडा घरकुल दोंडाईचा यांच्या घरी चोरांनी घराचा दर्शनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून गोदरेज कपाटातील रोख रक्कम दहा हजार रुपये चोरी करून चोरटे पसार झाले होते. तशी फिर्यादी दि 18 जानेवारी 25 रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशनला दाखल केलेली होती. चोरीच्या गुन्ह्यातील तपास चक्रे फिरवत पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्याचा तपास जलद गतीने फिरवून गुन्ह्यातील आरोपी अल्ताफ उर्फ अल्लू सरदार खान (20) रा डालडा घरकुल दोंडाईचा ता शिंदखेडा जि धुळे ह मु आंबेडकर नगर पाण्याच्या टाकीजवळ,लिंबायात उधना सुरत (गुजरात) व नदीम युसुफ शेख (26) रा अशोक नगर, दोंडाईचा यांना दोन दिवसात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलेला माल रोख रक्कम 8000 रु अल्ताफ उर्फ अल्लू सरदार खान याच्याकडून मिल परिसरातील हरजर मेहबूब पीर दर्गा जवळील काटेरी झुडपात लपून ठेवलेले दोन पंचांसमक्ष काढून घेऊन सदर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीवर चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीचा गुन्हा सलाबतपुरा पोलीस स्टेशन सुरत शहर येथे गुन्हा दाखल असून सदर आरोपी हा सहा महिने कारागृहात राहून सध्या जामिनावर सोडण्यात आलेला असून त्याला पोलिसी खाक्या दाखवला गेला तर इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. सदर गुन्ह्या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पो कॉ रवींद्र गिरासे, हिरालाल सूर्यवंशी, महेश शिंदे,प्रवीण निकुंभे,सौरभ बागुल, होमगार्ड अमीन शहा यांनी कामगिरी केली.