दोंडाईचा पोलीस ठाणे येथील बेवारस वाहनांचा २४ रोजी लिलाव

दोंडाईचा (गोपाल कोळी) – येथील पोलीस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्यांतील बेवारस दुचाकी वर्षानुवर्षापासून पडून आहेत. त्या दुचाकींचा पोलीस ठाण्याकडून जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. या वाहनांचे चेसीस व इंजीन क्रमांकाची तपासणी करून दि.२४ मार्च रोजी दोंडाईचा पोलीस ठाणे येथे जाहिर निलाव करण्यात येणार आहे.
लिलावात भाग घेणाऱ्यांनी दि.२२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १५ हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी. तसेच दिलेल्या मुदतीच्या आत अनामत रक्कम भरणाऱ्यांनाच लिलावात सहभाग घेता येणार आहे. लिलावातील बेवारस वाहनांची इंजिन नंबर व चेचीस नंबरची यादी लिलावातील अटी नियम हे पोलीस ठाण्याच्या आवारातील नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहेत, असे आवाहन दोंडाईचा पोलिस ठाण्याचे एपीआय श्रीकृष्ण पारधी यांनी केले आहे.