एकवीरा देवीच्या यात्रोत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, मनपा आयुक्तांसह पोलिसांची पाहणी……

धुळे – खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्या माध्यमातून यात्रोत्सवाच्या नियोजनाची मनपा आयुक्तांसह देवपूर पोलिसांनी पाहणी करत व्यापाऱ्यांना काही सूचना केल्या आहे. यंदाचे यात्रोत्सवावर अनुचित प्रकार घडू नये याकरिता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे, तर पार्किंग मोठ्या पुलाच्या पलीकडे करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहे. तसेच अग्निशामक दलाचे वाहन देखील 24 तास उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाविकांना आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी कुठलेही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता स्टॉल धारकांसह दुकानदारांना एकाच रांगेत दुकान लावन्याच्या सूचना करण्यात आला आहे.
धुळे शहराची ग्रामदेवता असलेल्या आई एकवीरा देवी यात्रेची चैत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात यात्रेचा आयोजन केल जात या यात्रेत एकविरा देवीच्या दर्शनासाठी दररोज भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता मनपा प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे. अशातच मनपा आयुक्तांनी थेट एकविरा देवी मंदिर परिसराची पाहणी करत यात्रोत्सवाच्या नियोजन करण्याच्या सूचना संबंधित मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
यावेळी मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, मनपाचे अभियंता नवनीत सोनवणे, नरेंद्र बागुल, चंद्रकांत जाधव, राजेश वसावे, यांच्यासह मनपाचे अधिकारी व देवपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.