धुळ्यातील चितोड रोड परिसरात युवकाचा निर्घुण खुन

धुळे – चितोड रोड परिसरातील मनपा शाळा क्रं.28 जवळ युवक गौरव किरण माने याचा मित्रानेच निघुर्ण खुन केल्याची गंभीर घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, डिजेच्या तालावर नाचण्यावरून धक्काबुक्की झाल्याचे किरकोळ कारणावरून वाद झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेचे पडसाद आज उमटले. सदर हत्या करणारा आरोपी हा मयताचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. सदर मयताच्या पोटात चाकूने सपासप वार करण्यात आले. ते वार पोटाच्या आतड्यापर्यंत गेले. सदर तरूणाला एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. परंतू दवाखान्यात नेण्यात पुर्वीच गौरव माने या युवकाचा मृत्यू झाला होता. गौरव माने याची हत्या करणारा आरोपी जय राजेंद्र पाकळे हा असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी घटनास्थळी येवून चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार आरोपीला देखील शोधण्याचे काम सुरू आहे.