गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना एलसीबीच्या बेड्या……

एलसीबी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवारांची माहिती अन एलसीबीकडून गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम…..
धुळे – दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातील गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेश अन एलसीबी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या स्ट्रॉंग नेटवर्कमुळे गुन्हेगारांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.
प्रणव किशोर शिंदे वय 20 वर्ष रा. विंचूर ता.जि. धुळे, विनय देवानंद नेरकर, वय 23 वर्ष रा. फॉरेस्ट कॉलनी, नगावबारी देवपूर धुळे असं ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम अन्वय देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव शिंदे च्या अंग झडतीत गावठी कट्टा तर विनय नेरकर च्या पॅन्टच्या खिशात एक मॅक्झिन व जिवंत काडतूस एलसीबीच्या पथकाला आढळून आले आहे. प्रणव शिंदे या आरोपी विरोधात धुळे शहरासह पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत देवरे, मुकेश वाघ, पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली आहे.