विदेशी दारुची चोरटी वाहतुक नरडाणा पोलीस स्टेशन ने रोखली, ६६ लाखांची विदेशी दारु वाहनसह हस्तगत

विदेशी दारुची चोरटी वाहतुक नरडाणा पोलीस स्टेशन ने रोखली, ६६ लाखांची विदेशी दारु वाहनसह हस्तगत
शिंदखेडा – नरडाणा पो.स्टे. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना गुप्त बातमी मिळाली की, इंदौरकडून धुळे कडे एक तपकिरी रंगाचे कंटेनर वाहन क्र.एच.आर.५६/सी. ९९९६ असे येत असुन सदर वाहनात बेकायदेशीररित्या दारुचे खोके ठेवून दारुची चोरटी वाहतुक होत असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरुन नरडाणा पो.स्टे.चे पोउनि मनोज कुवर व पोलीस अंमलदार यांनी दभाषी फाटा ता. शिंदखेडा जि. धुळे येथे दोन पंचांसोबत जावुन सापळा लावून दि. २०/०१/२०२५ रोजी ०३.४५ वाजेचे सुमारास दभाषी फाटा ता. शिंदखेडा जि. धुळे येथे तपकिरी रंगाचे अशोक लेलंड कंपनीचे कंटेनर वाहन क्र.एच.आर.५६ सी. ९९९६ असे येतांना दिसल्याने सदर वाहन चालकास थांबविण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे वाहन न थांबविता तो धुळयाचे दिशेने मुंबई-आग्रा महामार्गाने वेगाने चालवून नेत असतांना त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग केला असता वाहन चालकाने त्याचे कंटेनर वाहन बिकानेर हॉटेल समोर रोडचे साईडला उभे करुन सोडून पळून गेल्याने सदरचे वाहन शिताफीने पकडून सदरचे वाहन पंचांसमक्ष पाहीले असता सदर वाहनात एकुण ३५,२९,२०० -रु.किंमतीचे ऑल सिजन गोल्ड कलेक्शन रिजर्व व्हिस्की, मॅकडॉवल्स व्हिस्की, रॉयल चॅलेन्ज व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की अशाविविध कंपनीचे विदेशी दारुच्या ७५० मी.ली. व १८० मी. ली. चे बाटल्या असलेले खोके भरलेले मिळुन आल्याने सदरचा माल व ३०,००,०००/-रु. किं.चे तपकिरी रंगाचे अशोक लेलंड कंपनीचे कंटेनर वाहन क्र.एच.आर.५६ सी. ९९९६ असे एकुण ६५,२९,२०० रु. किं.चा मुद्देमाल जप्त करुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.वरील जप्त मुद्येमालातील विदेशी दारुचा माल हा फक्त पंजाब राज्यात विक्रीसाठी परवानगीचा असल्याचे आरोपीतास माहित असतांना तो पंजाब राज्य सोडून इतर राज्यात चोरटी विक्री करण्यासाठी मालाचे मालक, मालाचे खरेदीदार, मालाचे पुरवठादार व वाहनाचे मालक यांचे मदतीने कट करुन मालावरील किंमत, बारकोड व बुचवरील बॅण्डरोल तोडून पुरावा नष्ट करुन सदर विदेशी दारुचे मालाची बाजारात बेकायदेशीररित्या विनापरवाना चोरटी विक्री करण्यासाठी कब्जात बाळगून मालाची चोरटी तस्करी करुन चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोकॉ अर्पण मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म.प्रो.का.क. ६५ (अ), ६५ (ई), ८० (१) (२), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि मनोज कुवर हे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली नरडाणा पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोउनि
मनोज कुवर, ग्रे पोसई अजय सोनवणे, पोहेकॉ ललीत पाटील, विक्रांत देसले, भुरा पाटील, भरत चव्हाण, राकेश शिरसाठ, रविंद्र मोराणीस, चंद्रकांत साळुंखे, नारायण गवळी, साहेबराव पावरा, पोकों गजेंद्र पावरा, अर्पण मोरे, विजय माळी व चापोकों
सुरजकुमार सावळे अशांनी मिळून केली आहे.