शेवाडे जि.प.शाळेत वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन

शेवाडे जि.प.शाळेत वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन
शिंदखेडा – शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वॉटर प्युरिफायर कार्यान्वित करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य विरेंद्रसिंह गिरासे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील, माजी सरपंच रणजीतसिंग गिरासे उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती माजी सभापती श्रीमती छाया रणजीतसिंग गिरासे व माजी सरपंच रणजीतसिंग गिरासे यांच्यातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. माजी सभापती गिरासे यांच्या पंधरावा वित्त आयोगातून वॉटर प्युरिफायर जिल्हा परिषद शाळेत मंजूर करण्यात आले होते. त्याचेही लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी ए के अमृतसागर, राजेंद्र वाणी, नानाभाऊ कोळी, राजेंद्र गिरासे, राजाराम मोरे, बालकृष्ण वाणी, पांडू मोरे, बापू बागुल, तुषार माळी, भैय्या माळी, बबलू कोळी, बन्सीलाल माळी, पिंटू मोरे, शिवराम ठेलारी, जीवराज ठेलारी, भूषण येवले उपस्थित होते.