नंदुरबारमध्ये 27 मार्च रोजी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन
नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार तालुक्यातील नागरिकांच्या जमिनीच्या मोजणी आणि नगर भूमापन (सिटी सर्व्हे) संबंधी प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख (नंदुरबार) कार्यालयाच्या वतीने 27 मार्च 2025 रोजी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नंदुरबार येथे होणार आहे.
भूमी अभिलेख उप अधीक्षक किरणकुमार पाटील यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ज्या नागरिकांची कामे प्रलंबित आहेत किंवा ज्यांना आपल्या शेती जमीन अथवा नगर भूमापन (सिटी सर्व्हे) संदर्भात काही माहिती हवी आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.