December 23, 2024

धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात सामाविष्ट करण्याला दोडाईंचेतील आदिवासी संघटनेचा विरोध

दोंडाईचा, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे एकलव्य भिल्ल जन सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य व आदिवासी टाईगर सेनाच्या वतीने नंदुरबार चौफुली येथे रास्ता रोखो आंदोलन करून मा.अप्पर तहसीलदार दोडाईंचा व दोडाईंचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.किशोर परदेशी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
एकलव्य भिल्ल सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष व दोडाईंचा नगरपालिकेचे माजी नगरसेवक मा.रविभाऊ जाधवांची धनगर समाजाचे नेते मा.आ.गोपिचंद पडळकर यांच्यावर टिका
धनगर व धनगड या शब्दामुळे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आदिवासी व धनगर समाजात आरक्षणावरून मोर्चा आंदोलने तसेच अनेक गोष्टी घडत आहेत याच प्रश्नावर ट्रायबल रिसर्च सेंटर पुणे यांनी समिती गठित करून धनगर समाजाच्या चालीरीती व त्यांच्या संस्कृती सर्वांचा अभ्यास करून सर्वाच्च न्यायालयाला अहवाल पाठवला असता त्या अहवालाच्या मार्फत सर्वाच्च न्यायालयाने धनगर व धनगड मधील फरक स्पष्ट करून धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण देता येणार नाही असे निर्णय काढले होते तरी या तीन तोंडी सरकारने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण करू असे खोटे आश्वासन धनगर समाजाला दिले आहे . तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसा अगोदर पत्रकार परिषद मार्फत धनगर समाजाला आदिवासी मध्ये सामाविष्ट करू असा जिआर कढणार आहोत असे आश्वासन दिले होते तरी या गोष्टीचा आम्ही समाजा मार्फत जाहीर निषेध करतो व जर की असा निर्णय भविष्यात येत असेल तर पुर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधव तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील यावेळी बोलतांना दोडाईंचा नगरपालिकेचे मा.नगरसेवक रवि भाऊ जाधव यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आदिवासी समाजाबद्दला वक्तव्याचा जाहीर निषेध केला .

About The Author