महिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
शिंदखेडा पं स विस्ताराधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल- तोंडाला काळे फासत दिला महिलेने चोप
■ शिंदखेडा (यादवराव सावंत) – शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाच्या ३९ वर्षीय महिला विस्तार अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात घडली. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात विस्तार अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित पिडीत महिला अधिकारी यांनी विस्तार अधिकारी च्या टेबलजवळ जावुन संतोष सावकारे यांच्या तोंडाला काळे फासत चांगलाच चोप दिला हयावेळी सदरील महिलेने शिवसेना ( उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व तालुकाप्रमुख गिरिष देसले यांची मदत घेतली
शिंदखेडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या ३० वर्षीय महिला ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेविका) गुरुवारी दुपारच्या सुमारास शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात शासकीय कामातील धनादेशासंदर्भात ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संतोष किसन सावकारे यांच्या टेबलजवळ गेल्या. त्याने नेहमीप्रमाणे शरीर सुखाची मागणी केली.हयाबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारीकडे वारंवार तक्रार करुनही दुर्लक्ष करत होते म्हणुन संबधित अधिकारीला माज आला असावा शेवटी महिलाच हे पाऊल उचलावे लागले हया प्रकारामुळे शिंदखेडा शहरासह तालुक्यात महिलेच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे अशा भ्रष्ट व निर्लज्य अधिकारीस धडा शिकविणे गरजेचे आहे याबाबत महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात विस्तार अधिकारी संतोष किसन सावकारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी तपास करित आहेत.