अक्कलकुवा येथे मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा जप्त
तळोदा – अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खापर गावजवळ गुप्त माहितीच्या आधारे दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान, एमएच ४७ एएस ३६२८ क्रमांकाच्या आयशर वाहनातून अवैधरीत्या वाहतूक केलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या साठ्यासह एकूण २५,६७,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खापर गावाजवळ हरिकृष्णा हॉटेलजवळ, अंकलेश्वर-ब्रहानपूर हायवेवर ही कारवाई झाली. त्यात १,११३६० रुपये किमतीचे २९ बॉक्स, ४८ बाटल्यांचा समावेश असलेल्या इम्पीरियल ब्लू ब्रँडचे मद्य. १,२५,२८० रुपये किमतीचे २९ बॉक्स, ४८ बाटल्यांचा समावेश असलेल्या ऑल सीझन्स ब्रँडचे मद्य. रॉयल चॅलेंज, स्टर्लिंग रिझर्व्ह, ट्युबॉर्ग, कार्ल्सबर्ग, किंगफिशर, हेवर्ड्स ५००० यासारख्या ब्रँडच्या विविध आकारांच्या मद्याचा साठा सापडला. या जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत ८६७५४० रुपये असून, वाहनासह एकूण किंमत २५,६७,५४० रुपये एवढी आहे.
या घटनेत अज्ञात आरोपीने वाहन सोडून पळ काढला. अक्कलकुवा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६५ (ई) व १०८ नुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जी.आर. पाटील यांनी पुढील तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब भगत यांना निर्देश दिले आहेत. सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री. दर्शन दुगड सो. यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नी आर.पी.लोखंडे, पो.स. ई महेश निकम, पो.हे.काँ अजय पवार, विजय जावरे,विजय विसावे, रविंद्र पाडवी, विनोद नाईक, रमण वळवी, शिरीष वळवी, रविंद्र नरगाव, इंद्रसिग कोकणी यांनी केलेल्या या धडक कारवाईत अक्कलकुवा पोलिसांनी अवैध मद्य साठ्याचा मोठा साठा जप्त करून महत्त्वाचे यश मिळवले आहे.