December 20, 2024

अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक रोखली

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
धुळे – मा. डॉ. विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र, मा. श्री. प्रसाद सुर्वे साहेब संचालक (अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र, मा. श्रीमती. यु. आर. वर्मा मॅडम, विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक, श्रीमती. स्वाती काकडे मॅडम अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांनी विधानसभा निवडणूक 2024 आचारसहिता अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार निरीक्षक श्री देविदास नेहूल राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर ता. शिरपूर जि.धुळे मध्यप्रदेश राज्यालगत सीमावर्ती भागात गस्त घालीत असताना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, एक महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिक अप चार चाकी वाहन तिचा परिवहन क्रमांक एमएच 48 टी- 8133 मधून पनाखेड – चोंडी रस्त्याने ता. शिरपूर जि. धुळे येथून अवैधरीत्या शुद्ध मद्यार्क ( स्पिरीट)ची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली नुसार दिनांक 30/10/2024 रोजी मध्य रात्रीच्या वेळी पनाखेड – चोंडी रस्त्यावर सापळा रचून थांबलो असता समोरून संशयित वाहन क्र. एमएच 48 टी- 8133 हे येत असल्याचे दिसले त्यास थांबविण्याच्या इशारा केला असता. सदर वाहनाच्या चालकाने वाहन न थांबता जोरात चोंडी कडे नेत असतांना त्याचा पाठलाग करून पनाखेड-चोंडी रस्त्यावर झेंडेअंजन गावात थांबविले असता संशयीत इसम दिलीप उदेशिंग पावरा रा. बोराडी ता. शिरपूर जि. धुळे हा इसम सदरचे वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून अंधारात पळून पसार झाला. सदर वाहनाची तपासणी केली असता वाहना मध्ये एकूण 05 निळ्या रंगाचे प्लॅस्टिक ड्रम दिसून आले ते पूर्णपणे शुद्ध माद्यर्क (स्पिरीटने) भरलेलं मिळून आले असे 1200 लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरीट) चा साठा व चार चाकी वाहनासह एकूण रु. 5,77,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा मुद्देमाल जप्त करून संशयित फरार वाहन दिलीप उदेशिंग पावरा रा. बोराडी ता. शिरपूर जि. धुळे विरुद्ध महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमचे कलम 65 (अ), (ई) 90 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री देविदास नेहूल निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर हे करीत आहेत.
तसेच दिनांक 30/10/2024 रोजी श्री. ए. सी. मानकर दुय्यम निरीक्षक रा.उ.शु. शिरपूर, यांना मिळालेल्या माहिती नुसार बोर पाणी ता. शिरपूर जि. धुळे या ठिकाणी छापा मारला असता दिनेश सर्कल पावरा याचे राहते घरी एका निळ्या रंगाचें प्लास्टिक ड्रम व दोन प्लास्टिक कॅन मध्ये मिळून 300 लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरीट) मिळून रु. 20,000/- किंमतीचा मुद्देमाला जप्त करून त्याचे विरुद्ध देखील महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमचे कलम 65 (ई) 90 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री. ए. सी. मानकर दुय्यम निरीक्षक रा.उ.शु. शिरपूर हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. देविदास नेहूल, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर विभाग शिरपूर, श्री ए. पी. मते निरीक्षक सी. त,नाका हाडाखेड दुय्यम निरीक्षक श्री. ए. सी. मानकर रा.उ.शु. शिरपूर, व जवान सर्वश्री. के. एम. गोसावी, केतन जाधव, प्रतीकेश भामरे, प्रशांत बोरसे, शांतीलाल देवरे, वाहन चालक रविंद्र देसले, यांचे पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास श्रीमती. स्वाती काकडे मॅडम अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री देविदास नेहूल, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर विभाग, शिरपूर ता. शिरपूर, जि. धुळे हे करीत आहेत.

About The Author