नेर येथे बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक धुळे यांची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने धडक कारवाई
नेर – श्री डॉ. विजय सूर्यवंशी सो. मा. आयुक्त, रा.ऊ.शु म. रा. मुंबई, श्री प्रसाद सुर्वे, मा. संचालक (अं. व द) रा.ऊ.शु म.रा.मुंबई, श्रीमती उषा वर्मा मॅडम, विभागीय उपायुक्त नाशिक विभाग, नाशिक तसेच श्रीमती स्वाती काकडे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली विधान सभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने धुळे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क, विभागाची धडक कारवाई सुरु आहे. दि.२६.१०.२०२४ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक धुळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क धुळे यांच्या समवेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने महालकाळी शिवार (नेर) गायत्रीदेवी संजय जयस्वाल यांचे शेत गट नं ३६० मधील पक्के बांधकाम लगतपत्री शेड मध्ये महालकाळी पो. नेर ता. जि. धुळे. येथील बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर अचानक छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट देशी दारू रॉकेट ९० मिलीचे ३७४०० सीलबंद बाटल्या, ५०० लिटर क्षमतेचा तीन प्लास्टिक ड्रम त्यात १३०० लिटर बनावट देशी दारू ब्लेंड, २५० लिटर क्षमतेचे सहा प्लास्टिक ड्रम त्यात १५०० लिटर स्पिरीट, १००० लिटर क्षमतेचे ४ रिकामे बनावट देशी दारू ब्लेंड वासाचे प्लास्टिक ड्रम,, देशी दारू रॉकेट प्रवरा नगर लेबल असलेले बनावट ३२५ पुठ्ठे, देशी दारू रॉकेट प्रवरा नगर बनावट ४२००० जिवंत पत्री बुचे, बनावट देशी दारू रॉकेट प्रवरा नगर ४००० लेबल, ९० मिली क्ष्मतेच्या एकूण २४५०० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, मद्य बाटलीस पत्री बुच सिलबंद करण्याचे एक कॅपिंग मशीन, एकइलेक्ट्रिक ब्लेंड मिक्सर एक इलेक्ट्रिक जनरेटर, एकूण ४९ प्लास्टिक ट्रे, हायड्रोमीटर थर्मामीटर, डिंक बाटल्या, एक दुचाकी स्कूटर, चार प्लास्टिक नरसाळे, इत्यादी, असा एकूण रु. २५,२२,१००/- किमंतीचा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर घटना स्थळावरून गायत्रीदेवी संजय जयस्वाल, सुमित उर्फ गणेश संजय जयस्वाल आणि स्वप्नील उर्फ लाला संजय जयस्वाल हे सर्वजण रा. नेर ता. जि. धुळे पळून गेले.
सदरची कारवाई श्री.डी.एल. दिंडकर निरीक्षक, रा.ऊ. शु भरारी पथक धुळे, श्री आर. आर. धनवटे निरीक्षक धुळे श्री लीलाधर पाटील निरीक्षक मालेगाव, सर्व श्री दुय्यम निरीक्षक सचिन शिंदे, सौरभ आवटे, पी. बी. अहिरराव, श्रीमती शुभांगी मोरे, धुळे विभाग, सागर नलावडे दु. नि. मालेगाव, रियाज शेख दु. नि. मालेगाव स. दु.नी ए बी निकुंबे, जितेंद्र फुलपगारे, जवान सर्वश्री, धुळेकर, पावरा, मोरे, अहिरराव, सोनवणे, शेलार, पाटील, शिरसाळे, अस्वले. पानसरे,गाडे,आण्णा बहिरम, पालवी, वाहन चालक श्री. विजय नाहीदे, श्रीमती बी पाटील, पाटील यांचे पथकाने सदरची कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास श्री. डी. एल. दिंडकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक धुळे, हे करत आहे.
,