साक्री येथील पं.स.गटशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे यांना तक्रारदाराकडून 2 लाखांच्या लाचेची मागणी केल्यामुळे अटक
साक्री – लोकसेवक महेंद्र गोपाळराव सोनवणे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सांकी, जि. धुळे तथा अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक), धुळे यांनी तक्रारदार यांचे कडून 2,00,000 /- रुपये लाचेची मागणी केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर तक्रारदार यांचे ओम साई इन्टरप्राइझेस या नावाचे पिंपळनेर, ता. साक्री जि. धुळे येथे दुकान आहे. सदर फर्म मार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे पुरवठा करणे बाबत जिल्हा परिषद शाळांमार्फत प्राप्त पुरवठा आदेशानुसार साक्री तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अंदाजे एकुण 40,00,000/- रूपयांच्या बुट व पायमोजे हया वस्तु पुरवठा केल्या होत्या.
सदर अनुदान मागणीच्या फाईल जमा करून मला सदर वस्तुंचे बिल मला अदा करणे लोकसेवक महेंद्र गोपाळराव सोनवणे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सांकी, जि. धुळे तथा अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक), धुळे यांनी बुट व पायमोजे हया वस्तुंच्या बिल मागणीचे फाईल जमा करून अंदाजे एकुण 40,00,000/- रूपये बिलाच्या 05 टक्क्या प्रमाणे 2,00,000 /- रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि.30.09.2024 रोजी तक्रार केली होती.
सदर तकारीची दि.30.09.2024 रोजी व दि.01.10.2024 रोजी पडताळणी केली असता गट शिक्षण अधिकारी, महेंद्र सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे बुट व पायमोजे हया वस्तुंचे अंदाजे एकुण 44,00,000/- रूपये बिलाच्या 05 टक्क्या प्रमाणे 2,00,000/- रूपये लाचेची मागणी केली म्हणुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 व 7-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.