December 21, 2024

विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी दैनंदिन खर्चाचा हिशोब तपासण्याच्या प्रथम तारखा जाहीर

धुळे, दिनांक 4 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्त) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा दैनदिन खर्चाचा हिशोब तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी 6 व 7 नोव्हेंबर, 2024 रोजी होणार आहे. अशी माहिती निवडणूक खर्च तपासणी नोडल अधिकारी स्वराजंली पिंगळे यांनी दिली आहे.

त्यानुसार 08-शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी 6 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता तहसिल कार्यालय, शिंदखेडा येथे तर 09-शिरपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी 6 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता नगर पालिका हॉल, शिरपूर येथे होईल.

तर 06-धुळे ग्रामीण व 07-धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी 7 नोव्हेंबर, 2024 सकाळी 10.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे होईल. तर 05-साक्री विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी 7 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता पंचायत समिती, साक्री येथे होईल.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना खर्च करण्याची मर्यादा 40 लाख असून या तपासणीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाने आखून दिलेल्या विहित मर्यादेत खर्च करीत आहेत किंवा कसे ? याची खातरजमा निवडणूक खर्च निरीक्षक श्री. रामा नाथन आर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. जे उमेदवार निवडणूक खर्चाच्या आदेशांचे सारसंग्रहप्रमाणे खर्चाच्या नोंदी ठेवणार नाहीत. अशा उमेदवारांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस दिल्या जातील. जो उमेदवार निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करेल त्याला अपात्र करणेबाबत देखील निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. तरी 6 व 7 नोव्हेंबर, 2024 रोजी खर्च तपासणीच्या तारखांना स्वतः उमेदवारांनी किंवा त्यांच्या खर्च प्रतिनिधींनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे श्रीमती पिंगळे यांनी कळविले आहे.

About The Author