December 23, 2024

सर्वात युवा चेहरा दीपक गिरासे यांची अपक्ष उमेदवारी निर्णायक ठरू शकते मतदार संघात चर्चेला वेग…

शिंदखेडा – शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलीत त्यात राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी चे विद्यमान आमदार जयकुमार रावल हे पाचव्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरला तसेच महाविकास आघाडी कडून संदीप बेडसे यांनी तिसरींदा उमेदवारी करून लढत आहेत त्या सोबत अनेक इच्छुकांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात एक सर्वसामान्य कुटुंबातला युवक चेहरा म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक गिरासे यांनी युतीत बंडखोरी करून आपली अपक्ष उमेदवारी केली आहे या उमेदवारीचा मोठा फटका आमदार जयकुमार रावल यांना बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे विधानसभा मतदारसंघात सर्वात तरुण चेहरा म्हणून आणि सर्वसामान्यांचा भरोशाचा चेहरा म्हणून दीपक गिरासे यांच्याकडे पाहिले जाते गेल्या वीस वर्षांमध्ये ते राजकीय व सामाजिक क्षेत्रात खूप सक्रिय आहेत मेथी गट गणातून पंचायत समिती निवडणूक , जिल्हा परिषद पोटनिवडणूक मध्ये राष्ट्रीय पक्ष्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करून गिरासे यांनी मोठा हादरा दिला होता, भाजप व काँग्रेसच व महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मैदानात उतरायला भाग पाडले होते तरी विरोधात दीपक गिरासे यांनी चार हजार मतं घेतली होती काही थोड्या मतांनी त्यांचा पराजय झाला होता परंतु त्यांची राजकीय पकड गेल्या दोघी निवडणूक मध्ये त्यांनी दाखवून दिली होती. मेथी गट हा आमदार रावल यांचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते येथे सर्वच ग्रामपंचायतीत भाजप सत्ता असून परंतु दीपक गिरासे यांनी रावळांना रस्त्यावर उतरून प्रचार करायला भाग पाडले होते अशी चर्चा आजही होत आहे. पहिल्यांदाच राजपूत समाजातून शेतकरी कुटुंबातला युवक चेहरा म्हणून सर्व युवक त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत आहेत दीपक गिरासे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रचंड असल्याने त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सोशल मीडिया वर अनेक पोस्ट करत त्यांच्यावर मतदार विश्वास व्यक्त करताना दिसत आहे तालुक्यातील सिंचन विहिरींचे अनेक प्रकरण त्यांनी मार्गी लावत हजारो शेतकऱ्यांना सिंचन विहीर त्यांनी पुकारलेल्या लढ्यामुळे मिळाल्यात शेतकऱ्यांचा आशेचा किरण म्हणून दीपक गिरासे यांच्या माघे उभे राहतांना दिसत आहेत.
जरी दीपक गिरासे यांनी उमेदवारी कायम ठेवली तर त्याचा फटका विद्यमान आमदार जयकुमार रावलांना बसणार आहे, पुढील येणारा काळ सांगेल की त्यांची उमेदवारी कायम राहील किंवा नाही पाहण्याची उत्सुकता आहे.

About The Author