December 23, 2024

बाभळे एमआयडीसी व गोराणे फाटा येथे सेक्स कॅण्डलचा शिरकाव !

शिंदखेडा व नरडाणा पोलीसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह ?

शिंदखेडा (प्रतिनिधी) – शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा लगत असणार्‍या बाभळे एमआयडीसीमध्ये उद्योगांऐवजी भलतेच उद्योग चालू असल्याची चर्चा जनमाणसांत सुरू आहे. आमच्या प्रतिनिधीच्या गुप्त माहितीनुसार मौजे सरवड व गोराणे येथील अज्ञात 4 ते 5 इसम हे बाहेरून परराज्यातून मुली आणून त्यांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय केला जात आहे. त्याचप्रमाणे गोराणे फाटा येथील एका हॉटेलच्या बाजूला रात्री अमळनेर व जळगाव येथून अल्पवयीन मुली आणून वेश्या व्यवसाय करण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळेस शेतातून सदरहू महिला वाहनचालकांना बॅटर्‍या मारून आपल्याकडे बोलावित असल्याचे जनमाणसांत चर्चा आहे. गोराणे फाटा व बाभळे फाटा या दोन्ही ठिकाणी अवैध वेश्या व्यवसाय पोलीसांच्या नाकावर टिच्चून बिनधास्तपणे केला जात आहे. तरी पोलीस प्रशासनाने मौजे गोराणे व सरवड येथील दलालांचा शोध घेवून गोराणे फाटा व बाभळे फाटा येथे कोणत्या कंपन्यांच्या आड व कोणत्या शेताच्या आड वेश्या व्यवसाय केला जातो. याचा शोध घेवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी जनमाणसांतून होत आहे.

About The Author