December 23, 2024

शिंदखेडा मतदारसंघातील शिक्षण, सिंचन, आरोग्य व रस्त्यांचा अनुशेष भरून काढणार – आ.जयकुमार रावल

मा.जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागात रस्ता सुधारणा कामांचे भूमीपूजन

नंदाने – सवाई मुकटी – तामसरे -जखाणे – शेवाडी – वाडी , रेवाडी , दिवी ,सतारे ,कलँ 36 किलोमीटर रस्त्याचे भूमीपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आले

खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी खेड्याकडे चला अशी हाक दिली होती.जेणेकरून गावखेड्यातील सक्षमीकरण होईल हाच गांधींजीचा उद्देश होता त्याच उद्देशाने मा.आ.जयकुमार भाऊ रावल यांच्या विकासकामांचा धडाका सुरू आहे.

शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक गाव खेडी स्वंयपुर्ण व्हावे ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी जनतेचा विकास व्हावा खेडेगाव व शहरातील आर्थिक देवाणघेवाणाचे मुख्य श्रोत म्हणजे रस्ता हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मा.जयकुमार भाऊ रावल यांनी मागील पंधरा वर्षापासून दोडाईंचा शिंदखेडा शहरं सह तालुक्यातील खेडेगावांचा विकासावर भर दिला आहे.

दि.5 अॉक्टोंबर रोजी सवाई मुकटी येथे सर्वजनिक बांधकाम विभाग हायब्रीड अँन्यूटी मॉडेल (HAM) अंतर्गत रा.मा. 13 नंदाणे , सवाई मुकटी , तामसरे जखाणे वाडी शेवाडी रेवाडी दिवी सतारे कलँ असा 36 किलोमीटर रस्ता सुधारणा करणे या कामाचे भूमीपूजन संपन्न झाले . यावेळी दोडाईंचा शिंदखेडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.जयकुमार रावल, बाजार समिती सभापती नारायण पाटील , जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र देसले महिला बालकल्याण सभापती डी आर पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती पंकज कदम तालुका अध्यक्ष दीपक बागल सभापती रंजीत गिरासे उपसभापती दीपक मोरे बाजार समितीचे उपसभापती प्राध्यापक खैरनार जिल्हा परिषद सदस्य धनंजय मुंडे ,प्रभाकर पाटील ,भूपेंद्र गिरासे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र दिलासे बाजार समिती संचालक शिवरंगराव पाटील माजी तालुका अध्यक्ष नाना पाटील माजी सभापती डॉक्टर दीपक बोरसे माजी उपसभापती रविंद्र जयश्री पाटील दरबार सिंग गिरासे , लखन रुपनर ख.वि. संचालक मधुकर सिसोदे पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे ,माजी बाजार समिती सदस्य रवींद्र देसले ,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंटी बागुल सवाई मुकटीचे माजी सरपंच मनोज पाटील सवाई मुकटीचे सरपंच पुनम नंदकिशोर देसले, उपसरपंच आनंद अहिरे, बबलू कोळी, कैलास बोरसे ,बापू पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author