केशरानंद उद्योग समूहाचे संचालक रविराज भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप
दोंडाईचा – दोंडाईचा, केशरानंद उद्योग समूहाचे संस्थापक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांचे जेष्ठ सुपुत्र रविराज भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. याप्रसंगी दोंडाईचाचे माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांनी उपक्रमाचे कौतुक केले. चांगला, स्तुत्य उपक्रम राबवून सामाजिक काम केल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.
केशरानंद परिवाराचे प्रमुख तथा उद्योग समूहाचे संस्थापक ज्ञानेश्वर भामरे यांचा वसा आणि वारसा पुढे चालवावा. अन्यायग्रस्त तालुक्यातील गुलामगिरी दुर करण्यासाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र यावे. येणाऱ्या काळात सक्षम नेतृत्व देणार आहोत, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख यांनी यावेळी केले. दोंडाईचातील केशरानंद नगरात माजी नगरसेवक रविराज भामरे यांच्या अभिष्टचिंतन व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. देशमुख बोलत होते. माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप बेडसे, जि. प. सदस्य ललित वारूळे, माजी जि.प.सदस्य कामराज निकम, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख शाहणाभाऊ सोनवणे, कृउबाचे माजी सभापती दिलीप पाटील, रामसिंग गिरासे, सुरेश देसले, अँड. एकनाथ भावसार, राजेंद्र देशमुख, माजी सभापती रामभाऊ माणिक, भूपेंद्र धनगर, नंदु सोनवणे, डॉ. जयवंतराव बोरसे, रवींद्र जाधव, हेमराज पाटील, दाजभाऊ माळी, मालपुर गावाचे सरपंच हेमराज पाटिल , माजी उपसरपंच प्रकाश पाटील बन्सीलाल माळी, एम.पी. पाटील, नथ्थू सोनवणे, प्रकाश पाटील, अनिता गिरासे, अंजना भामरे, महेंद्र पाटील आदि उपस्थित होते.
केशरानंद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, माजी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे म्हणाले की, निवडणुकीत बिनविरोध ग्रामपंचायतींना बारा वर्षांपूर्वी शवपेटया वाटप करण्यात आले. तेव्हापासून अविरतपणे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. सामान्य जनतेचा अन्याय दुर करण्यासाठी काम करत आहे. तापीवरील बॅरेज बांधले गेलेत. पण पाणी शेतात आले नाही. आ. जयकुमार रावल यांना विकासाचा दृष्टिकोन नाही. भाजपचे उमेदवार षडयंत्र करून निवडून येतात. आपणही दहा पटीने ते करू शकतो, असे सांगून शिंदखेडा तालुक्यातील सर्वच जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना येणाऱ्या आठ दिवसांत दहा हजार दप्तर वाटप करण्यात येईल, असे ते म्हणाले. जि.प. शाळेतील विद्यार्थी मिळालेल्या दप्तरमुळे नियमित शाळेत जाण्यासाठी प्रेरीत होतील, असे सांगून कामराज निकम म्हणाले की, सगळे मिळून एकत्र लढु ही शपथ घ्यावी. भाजपाला हद्दपार करा. ज्ञानेश्वर भामरे यांचा वसा आणि वारसा पुढे चालवा. ललित वारूळे म्हणाले की, केशरानंद उद्योग समूहाचे मालक ज्ञानेश्वर भामरे यांना दुर्लक्ष करून कोणीही या भागाचा आमदार होऊ शकत नाही. सिंचन, रोजगार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. यासाठी आपल्याला काम करावे लागले. दर्जेदार शिक्षण नाही, आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. आश्वासक चेहरा म्हणून श्री. भामरे यांच्याकडे पाहीले जात आहे. एकत्र राहीलो तर भाजपचे आमदार पराभूत होतील. दिलीप पाटील यांनी सामाजिक कामात पुढाकार घ्यावा असा सल्ला दिला. अँड. एकनाय भावसार म्हणाले की, भाजपचे आमदारांना चितपट करण्याची ताकद ज्ञानेश्वर भामरे यांच्यात आहे. शिवराज भामरे यांनी औद्योगिक, सामाजिक क्षेत्रात आपल्या पिताश्रीना रिटर्न गिफ्ट दयावे, असे सांगू त्यांनी रविराज भामरे यांचे अभिष्टचिंतन केले.