पोलीस मुख्यालय परेड मैदानात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न
धुळे (जिमाका वृत्त) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अपर तहसिलदार कार्यालय,धुळे शहर व मुक्ता आदिवासी बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस मुख्यालय परेड मैदान, धुळे येथे मतदार जनजागृती कार्यक्रम आज संपन्न झाला.
यावेळी श्री.सुनिल दावळे यांनी होमगार्ड बांधवाना मतदानाचे महत्व पटवून देवून येत्या 20 नोव्हेंबर, 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू न देता आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी होमगार्डांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी आयटीआयचे शिल्प निदेशक सुनील दावले , कलाशिक्षक संघरत्ना नेरकर, कनिष्ठ लिपिक नाना पाटील, रुपेश वाडीले,मुक्ता आदिवासी बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा मोनिका शिंपी, श्री.बारी उपस्थित होते. असे 07 धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप नोडल अधिकारी तथा मनपा उपायुक्त शोभा बाविस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.