धुळे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 39 व्यक्तींनी घेतले 67 नामनिर्देशन पत्र
धुळे – विधानसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघासाठी 39 व्यक्तींनी 67 नामनिर्देशन पत्र घेतल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
विधानसभा मतदार संघ निवडणूक-2024 ची अधिसूचना 22 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज तिसऱ्या दिवशी 05- साक्री विधानसभा मतदार संघासाठी 12 व्यक्तींनी 20 अर्ज, 06-धुळे ग्रामीण 8 व्यक्तींनी 9 अर्ज, 07-धुळे शहर 7 व्यक्तींनी 16 अर्ज, 08-शिंदखेडा 6 व्यक्तींनी 10 अर्ज तर 09-शिरपूर मतदार संघासाठी 6 व्यक्तींनी 12 अर्ज असे एकूण पाच विधानसभा मतदार संघासाठी 39 व्यक्तींनी 67 अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.