शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीतर्फे कमखेडा येथील भूमिपूत्र हितेंद्र पवार यांची उमेदवारी
शिंदखेडा (गोपाल कोळी) – शिंदखेडा विधानसभा आम आदमी पार्टीतर्फे कमखेडा येथील भूमिपूत्र हितेंद्र पवार उमेदवारी करणार असल्याचे अधिकृत वृत्त सूत्रांकडून प्राप्त झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीतर्फे दिपक गिरासे निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. परंतू जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार हेच निवडणूक लढविण्याचे असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. आम आदमी पार्टीतर्फे शेतकरी, शेतमजूर, कामगार, व वंचित घटकांसाठी वेळोवेळी आंदोलन व कामांचा पाठपुरावा केला जात असल्यामुळे जनसामान्यांतून उत्कृष्ठ प्रतिसाद असल्याचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार यांनी चांगले मताधिक्य प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.