December 23, 2024

देशभरातील भाविकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शौचालयाची निर्मिती,आ.फारुख शाह यांचे बाबा धिरजसिंग यांनी मानले आभार

धुळे – महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे गुरुद्वारालगत शौचालय बांधणे या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे बंधु सलिम शाह यांचे शुभहस्ते करण्यात आला मौलाना शकील, डॉ. दीपश्री नाईक निजाम सय्यद छोटू शेठ मच्छी वाले जनरल सिंग रंजना नेवे ,डॉ.बापुराव पवार,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गुरुद्वाराचे मुख्य मा. धीरज सिंग बाबा होते. धुळे शहराच्या दक्षिण दिशेला असलेल्या गुरुद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे या गुरुद्वारात देशभरातील सर्व जाती धर्माचे लोक येऊन राहत असतात तसेच शीख धर्मीय लोक देशभरातील गुरुद्वारांना भेटी देत असताना धुळ्यातील गुरुद्वारात थांबत असतात या ठिकाणी शौचालय व न्हाणीगराची संख्या कमी असल्याने शहरातील आणि देशभरातील भाविकांची गैरसोय होत होती ही गोष्ट धीरजसिंग बाबा यांनी फारुक शाह यांच्या समोर मांडली आमदार फारुक शाह यांनी तत्काळ यासाठी मूलभूत सोयी सुविधा 45 लाख निधी मंजूर करून आणला आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैसर अहमद यांनी केले तर आभार अकिब अली यांनी मानले.यावेळी गुरुमितसिंग मदान, मंगतसिंग चावला, दर्शनासिंग चावला, जोगींदरासिंग गोराया, प्रदिपसिंग घई,बाजासिंग खैरा,नरेंद्रपालसिंग सैनी,आसिफ शाह,पापा सर, फूजेल आझमी, सउद सरदार,परवेज शाह, सउद आलम,सलमान खान, कौसर शाह,रियाज शाह,हमीद शाह,सत्तार शाह, आसिफ अन्सारी,मूक्तार अन्सारी,साबीर सरदार,शाहिद अन्सारी,कलीम शमसुद्दीन आदी उपस्थित होते.

About The Author