December 23, 2024

वनरक्षकाला बेदम मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या 4 चोरट्यांना अटक

दोंडाईचा पोलीसांकडुन तांत्रिक तपासाच्या आधारावर जबरी चोरीच्या गुन्हयाची उकल

आरोपींन कडुन 1,20,000/- रुपये व गुन्हा करतेवेळी वापरलेली 1,50,000/-रुपये किंमतीची मारुती इको कंपनीची पांढऱ्या रंगाची गाडी हस्तगत

दोंडाईचा  – दोंडाईचा पोलीस स्टेशन कडील दाखल गुरनं-२१७/२०२४ बीएनएस कायदा-२०२३ चे कलम-३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा हा दिनांक- २६/०९/२०२४ रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात फिर्यादी नामे अधिकार बापु पदमोर हा तोरणमाळ जि. नंदुरबार येथुन हट्टी ता. साक्री कडे शहादा दोंडाईचा मार्गे येत असतांना दोंडाईचा-मालपुर रस्त्यावरील म्हसल्ल्या मारुती नगरकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रात्री ११.०० वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या चार चाकी मारुती कंपनीची इको गाडीत बसलेल्या चार अनोळखी आरोपीतानी फिर्यादीच्या मोटार सायकलीच्या पुढे त्यांची गाडी थांबवुन त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीस मारहाण करुन दुखापती करुन फिर्यादीच्या पाठीला लावलेली १,८०,०००/- रुपये रोख रक्कम असलेली पैशांची बॅग बळ जबरीने हिसकावून घेवुन त्यांचे जवळील पांढ-या रंगाचा इकोगाडीने दोंडाईचा शहराकडे पळुन गेले म्हणुन गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा त्यांनी वापरलेल्या वाहनाचा व चोरुन नेलेल्या रकमेचा श्री किशोरकुमार बी परेदशी पोलीस निरीक्षक दोंडाईचा पोलीस ठाणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे याचे मार्गदर्शना खाली पो.उप.नि./हॅमत बी. राऊत, पो. कॉ./456 हिरालाल सुर्यवंशी, पो. कॉ/1638 महेश शिंदे, पो.कॉ./1714 प्रविण निकुंभे, पो.कॉ./1751 शुभम चित्ते अशांचे पथक कसोसिने शोध घेत होते.
दिनांक -३०/०९/२०२४ रोजी सदर गुन्ह्यातील मिळालेल्या गोपनिय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहीती वरुन तांत्रिक बाबींचा आधार घेत गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणेकामी श्रीकांत धिवरे सो पोलीस अधिक्षक, धुळे, किशोर काळे अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, भागवत सोनवणे उपविभागय पोलीस अधिकारी, शिरपुर विभाग, शिरपुर जि.धुळे, यांचे मार्गदर्शनाखाली किशोरकुमार बी परेदशी पोलीस निरीक्षक दोंडाईचा पोलीस ठाणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे, यांचे सुचने प्रमाणे पो.उप.नि./हेंमत बी. राऊत, पो.कॉ./456 हिरालाल सुर्यवंशी, पो. कॉ/1638 महेश शिंदे, पो.कॉ./1714 प्रविण निकुंभे, पो.कॉ. /1751 शुभम चित्ते अशांसह छ. संभाजीनगर ला रवाना झाले. दिनांक-०१/१०/२०२४ रोजी आरोपी नामे-अभिषेक मोरे, जि. हिंगोली व त्याचे सोबत असलेला हमीद शेरखान पठान जि. अहमदनगर यांना छ. संभाजीनगर येथे मिळुन आल्याने त्यांची सखोल विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. व त्यांचे पोलीस कस्टडी दरम्यान त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन व गुन्ह्यातील त्याचे सोबत असणारे इतर दोन साथीदार नामे-विशाल भगवान कानकाटे, जि. अहमदनगर व ओमकार रामदास कदम, जि. नाशिक. यांचे नावे व फोन नंबर सांगितले त्यावरुन तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन विशाल भगवान कानकाटे, यास संगमनेर जि. अहमदनगर व त्याचा साथीदार नामे-ओमकार रामदास कदम, जि. नाशिक यास नाशिक येथुन ताब्यात घेवुन आरोपी हे पोलीस कस्टडीत असतांना त्यांना विचारपुस करता त्यांनी गुन्ह्यात जबरी चोरी केलेली रक्कम ९,२०,०००/- रुपये रोख त्यात ५०० रुपये दराच्या २४० भारतीय चलनी नोटा, गुन्हा करतेवळी वापरलेले वाहन मारुती इको कंपनीची पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक MH-१२-GF-२९५९ व फिर्यादीस मारहाण करतांना वापरलेले हत्यार ही दोन पंचां समक्ष काढुन दिल्याने गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई हि श्रीकांत धिवरे पोलीस अधिक्षक, धुळे, किशोर काळे अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, भागवत सोनवणे उपविभागय पोलीस अधिकारी, शिरपुर विभाग, शिरपुर जि.धुळे, किशोरकुमार बी परेदशी पोलीस निरीक्षक दोंडाईचा पोलीस ठाणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे याचे मार्गदर्शना खाली 4 पो.उप.नि./हेंमत बी. राऊत, पो. कॉ./456 हिरालाल सुर्यवंशी, पो. कॉ/1638 महेश शिंदे, पो. कॉ./1714 प्रविण निकुंभे, पो.कॉ./1751 शुभम चित्ते अशा पथकाने हि कारवाई केली आहे.

About The Author