December 23, 2024

घुसरे येथील निकिता मराठे ची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी नियुक्ती

नियुक्ती आदेश आ जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रदान
शिंदखेडा – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणुन तालुक्यातील घुसरे येथील निकिता समाधान मराठे यांची जि प मराठी शाळा घुसरे येथे नियुक्ती करण्यात आली असल्याचे रुजु आदेश विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जि प धुळे यांच्या स्वाक्षरीने नुकताच पारित झाला आहे सदर रुजु आदेश शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते निकिता मराठे यांना प्रदान करण्यात आला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थीस प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा व आपली कौशल्यवृद्दी व्हावी त्यामुळे आपणास विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा उद्देश आहे सदर प्रशिक्षण कालावधीत शैक्षणिक पात्रतेनुसार विदयावेतन मिळणार आहे निकिता मराठे यांची नियुक्ती झाल्याबद्दल घुसरे गावासह परिसरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे निकिता मराठे या घुसरे येथील तसेच ग्राहक सेवा केंद्र वरुळ रोड शिंदखेडा चे संचालक समाधान मराठे यांच्या पत्नी आहेत.

About The Author