दिव्यांगांना मदतीचा हात देणे गरजेचे – संदीप बेडसे
जागतिक अंध काठी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी (श. प.) पक्षातर्फे साहित्याचे वाटप
शिंदखेडा – समाजातील उपेक्षित अंग असलेल्या दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यामुळे आज हे साहित्य वाटप करीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी केले.
शिंदखेडा शहरालगत असलेल्या साई लॉन्स मंगल कार्यालयात राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिक या संघटनेच्या वतीने जागतिक अंधकाठी दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 100 अंध बांधवांना पांढरी अंध काठी व बॅग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे साहित्याचे वाटप करण्यात आले.
राज्यातील महायुती सरकारने दिव्यांगांसाठी कोणतीच भरीव कामे केली नाहीत. नावाला केवळ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची स्थापना केली. मात्र या महामंडळाच्या माध्यमातून कुठलेच काम दिव्यांग बांधवांसाठी केले नसल्याची टीका संदीप बेडसे यांनी केली. भविष्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी भरीव काम करण्याचे आश्वासन यावेळी संदीप बेडसे यांनी दिले. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष देविदास मोरे, जगन्नाथ पवार तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे महासचिव दत्तू बोडके, युवा सचिव राहुल पवार, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष सचिन भदाणे, सचिव सचिन शिरसाठ, प्रफुल्ल पाटील, गणेश न्हावी तर प्रमुख पाहुणे म्हणून शालिक पाटील, रामचंद्र पाटील, हिलाल सपकाळे, अनिल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत पाटील दत्तु बोडके सचिन भदाणे राजेद्र सोनवणे राहुल पवार सचिन शिरसाठ गणेश न्हावी प्रफुल पाटील अमोल गोसावी प्रशांत निकम यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन विभागीय शाखेचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर महासचिव दत्तु बोडके यांनी केले