December 23, 2024

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 तारखेला मतदान तर 23 नोव्हेंबरला लागणार निकाल, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
यात महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 तारखेला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यात आजपासून आचारसंहिता लागू, महाराष्ट्रात 9 कोटी 3 लाख मतदार, महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदान केंद्र, 29 लाख हे नव मतदार असणार, 1 लाख 186 पोलिंग स्टेशन असणार, महाराष्ट्रातील जिल्हे 36 आहेत, एकूण मतदार संघ 288, महाराष्ट्रात 288 पैकी 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. तर झारखंडमध्ये 24 जिल्हे आहेत. यात एकूण 81 जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे. यातील 28 जागा या एसटी प्रवर्ग आणि 9 जागा या एससी प्रवर्गासाठी राखीव असतील. झारखंड विधानसभेचा कार्यकाल 5 जानेवारी रोजी संपणार आहे. या राज्यात 2.6 कोटी मतदार आहेत. यात 1.29 कोटी महिला तर 1.31 कोटी पुरुष मतदार आहेत.

About The Author