आचार संहिता दरम्यान राजकीय पक्षाचे बेकायदा बॅनर झळकल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार!
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील काठोळे यांचा इशारा!
नवी मुंबई (सुनील गायकवाड) – महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे व निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहिता व नेम सर्वच राजकीय पक्षांना लागू झाले आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यापासून कोपरखैरणे प्रभाग समिती अंतर्गत सर्वच राजकीय पक्षांचे झळकणारे बॅनरवर कोपरखैरणे प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने आचारसंहिता पथकाने कारवाई केलेली आहे व तेथील बॅनर त्वरित हटविले आहेत मात्र याच हटवलेल्या बॅनर च्या जागी पुन्हा दुसरे बॅनर लागल्याचे कोपरखैरणे प्रभाग समिती अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सुनील काठोळे यांच्या लक्षात आलेले आहे. ही बाब आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे म्हणून कोपरखैरणे प्रभाग अंतर्गत कोणत्याही राजकीय पक्षांनी बेकायदा बॅनर्स आदर्श आचारसंहितेच्या दरम्यान झळकवू नयेत अथवा जाहिरात बाजी करू नये असे आवाहन सुनील काठोळे यांनी केली आहे.
दरम्यान: सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याबाबतची गंभीर दखल घेऊन आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही म्हणून दक्षता घ्यावी ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असे निदर्शनास आले तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येथील असा सूचक इशारा देखील सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सुनील काठोळे यांनी दिला आहे.